चांगली बातमी! अंगणवाड्यांमधील सर्व भरती प्रक्रियांना मंजुरी मिळाली!

Anganwadi Sevika Bharti 2025

Anganwadi Sevika Bharti 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचे उद्दिष्ट ठरवले आहेत. याअंतर्गत महिला- बालविकास विभागाने रिक्त पदे भरायचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी नवीन भरती केली जाईल, ज्यासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या मदतनीसांना किमान दहावी पास असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार थेट सेविका पदावर नियुक्ती दिली जाईल आणि त्यांना मदतनीस पदावरून सेविका पदावर पदोन्नती मिळेल. त्यानंतर रिक्त असलेल्या सेविका आणि मदतनीस पदांसाठी जाहिरातीद्वारे भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.

ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये त्या-त्या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल, तर महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात देखील त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक उमेदवारांना अर्ज करण्याचा हक्क असणार आहे. पूर्वीच्या नियमांनुसार, फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून निवडले जात होते. मात्र आता, महापालिका क्षेत्राच्या संपूर्ण परिसरातून निवडीची प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे, उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा होईल आणि अधिक गुणवत्ता व कौशल्य असलेले उमेदवार निवडले जातील.

ही अंगणवाडी भरती विशेषतः महत्त्वाची आहे कारण यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. याऐवजी, उमेदवारांच्या गुणांकनावर आधारित निवड प्रक्रिया केली जाईल, ज्यामध्ये त्यांच्या पात्रतेचे, अनुभवाचे आणि इतर संबंधित निकषांचे मूल्यांकन होईल. त्यामुळे, या भरती प्रक्रियेत भाग घेणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि इतर उपलब्धीसाठी तयार असावे लागेल. यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणात्मक होईल.

Anganwadi Sevika Bharti 2025

Anganwadi Sevika Bharti 2025
Demo