“नाशिक महापालिकेत 761 पदांची भरती होणार; Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महापालिकेत ७६१ पदांची भरती लवकरच होणार असून, संबंधित फाइल सध्या मुख्यमंत्री कार्यालयात आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठी पालिकेने प्रचंड पाठपुरावा केला आहे. अखेर, या भरतीसाठी मान्यता मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, पालिकेने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे संबंधित प्रस्ताव सादर केला. त्यावर त्यांनी मौखिक मान्यता दिली असून, लवकरच या भरतीच्या प्रक्रियेची पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती समोर आली आहे.

नाशिक महापालिकेच्या या भरतीमध्ये एकूण ७६१ पदांचा समावेश आहे, ज्यामध्ये अग्निशमन आणि आरोग्य विभागात ६२१ पदे आहेत. तर अभियांत्रिकी विभागात १४० पदे रिक्त आहेत. या पदांची भरती होण्यामुळे महापालिकेतील कार्यक्षमतेत सुधारणा होईल, तसेच महत्त्वाच्या सेवांमध्ये गती येईल. कुंभमेळ्याच्या काळात या भरतीची महत्त्वाची भूमिका असणार आहे, त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. आता पालिकेला अपेक्षेनुसार मान्यता मिळाल्याने येणाऱ्या काळात या भरतीची कार्यवाही सुरू होईल.


Demo
Nashik Mahanagarpalika Bharti 2025

761 vacancies will be filled in Nashik Municipal Corporation, and the file is currently with the Chief Minister’s office. These crucial positions, which have been pending for the last two years, are now showing signs of approval after extensive follow-up. Against the backdrop of the Kumbh Mela, the Municipal Corporation submitted a proposal to the Chief Secretary, Sujata Sonik, who has given verbal approval. The next steps in the recruitment process are expected to begin soon.

The recruitment will cover a total of 761 positions, including 621 in the fire and health departments and 140 in the engineering department. Filling these vacancies will significantly enhance the efficiency of the Municipal Corporation and speed up essential services. These recruitments are especially crucial during the Kumbh Mela, a major event for the city, which is why the administration has prioritized the approval process. Now that approval has been granted, the recruitment procedure is expected to proceed in the near future.