MMRDA Job Fair- ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे.

1088

MMRDA Online Job Fair 2020

MMRDA Online Job Fair 2020 : Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Pandit Deendayal Upadhyay Online Rojgar Melava is recruiting 17,000 vacancies from various contractors. For this Thane District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center office from 6th to 8th July 2020 and Mumbai Suburban and Mumbai City Offices from 8th to 12th July 2020 from 10 am to 06 pm. For more information regarding MMRDA Online Job Fair 2020. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this MMRDA Online Job Fair 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


MMRDA- कंत्राटदारांकडील १७ हजार पदांची भरती, ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (MMRDA) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे १७ हजार पदांच्या (17 thousand vacancies) भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (Online Rojgar melava) आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे १७ हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.

अर्ज कसा करावा

  1. राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
  2. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
  3. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
  5. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
  6. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.

MMRDA Online Job Fiar 2020

Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.