डिसेंबरनंतर १० हजार पदांची मेगा पोलिस भरती.

7119

Maharashtra Police Bharti 2020

Maharashtra Police Bharti 2020: पोलीस भरती लवकरच डिसेम्बर २०२० मध्ये अपेक्षित आहे. रिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी आणि अपडेट्स सुरु आहेत.  राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.

Maharashtra Police

सध्या राज्यातील पोलिसांचे काम वाढलेलं आहेत, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.

पोलीस भरती २०२० संदर्भातील महत्वाचे मुद्दे आम्ही देत आहोत : 

  • आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया
  • आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती
  • कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्‍त झाली पदे
  • भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती
  • 2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्‍त

या सर्व अनुषन्गाने असे लक्षात येते कि डिसेंबर २०२० नंतर सुमारे १० हजार रिक्‍त पदांची पोलीस भरती राबविण्यात येईल असे चित्र आहे. 

पोलिसांसमोर कोरोनाचं मोठं संकट

सध्या राज्यावर कोरोनावर मोठं संकट आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील हजारो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पोलीस दलातील पावणे दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात १५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत २ हजार ५० अधिकाऱ्यांसह १८ हजार ८९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १४ हजार ९७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला ३ हजार ७२९ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ४६१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सोर्स – लोकमत

Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner