जवळपास 30 हजार जागा भरणार, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्री

6653

Arogya Vibhag Bharti 2020

Arogya Vibhag Bharti 2020 – Maharashtra aarogya vibhag MahaBharti 2020 is starting Soon For 30,000 Vacancies in all over Maharashtra. More Updates about this Bharti process will be update on this page. This recruitment will be direct Recruitment i.e. Without Entrance Examinations.

Arogya Vibhag Bharti 2020 Details

“राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.” (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy)

रिक्त जागांचा तपशील  ?

  • सार्वजनिक आरोग्य विभाग – 17 हजार 337
  • वैद्यकीय शिक्षण विभाग – 11 हजार
  • राज्यभरातील मनपा रुग्णालयांत हजारो जागा रिक्त

माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy) म्हणाले.